LPG सिलेंडरची होम डिलिव्हरी सिस्टीम बदलली,अशी असेल नवीन प्रक्रिया.

1 min read

LPG सिलेंडरची होम डिलिव्हरी सिस्टीम बदलली,अशी असेल नवीन प्रक्रिया.

डोमेस्टिक सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्या 1 नोव्हेंबरपासून नवीन LPG सिलेंडर डिलीव्हरी सिस्टीम लागू करणार आहेत.

मुंबई-आता एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया पूर्वीसारखी राहणार नाही ,कारण पुढच्या महिन्यापासून डिलीव्हरी सिस्टीम बदलणार आहे. डोमेस्टिक सिलेंडरची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्या 1 नोव्हेंबरपासून नवीन LPG सिलेंडर डिलीव्हरी सिस्टीम लागू करणार आहेत. ही नवीन सिस्टीम काय आहे आणि आता होम डिलीव्हरी कशी होईल, हे आपण जाणून घेऊयात

  • या नवीन सिस्टीम चे नाव DAC म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे ठेवले गेले आहे.

  • आता, फक्त बुकिंग करून, सिलेंडरची डिलीव्हरी होणार नाही, मात्र आता आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक कोड पाठविला जाईल, जोपर्यंत आपण डिलीव्हरी करणाऱ्याला तो कोड दाखवणार नाही तोपर्यंत ती डिलीव्हरी पूर्ण होणार नाही.

  • एखादा ग्राहक असेल ज्याने डिस्ट्रीब्यूटरकडे मोबाइल नंबर अपडेट केला नसेल तर डिलिव्हरी बॉयकडे एक अँप असेल ज्याद्वारे आपण आपला नंबर रिअल टाइममध्ये अपडेट करू शकाल आणि त्यानंतर कोड जनरेट करण्यात सक्षम होईल.

  • अशा परिस्थितीत ज्यांचे पत्ते चुकीचे आहेत आणि मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा ग्राहकांच्या अडचणी वाढल्या जातील, त्यामुळे त्या सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.