आयसीसी टी-20 वर्ल्ड कप दुबईत होणार

आयपीएल स्पर्धा संपताच टी - 20 वर्ल्डकप सुरु होईल

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप दुबईत होणार

नवी दिल्लीः कोरोना मुळे टी-20 वर्ल्डकप कधी होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पुरुषांची आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा हे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे आज (29 जून) आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. स्पर्धा युएई आणि ओमान येथे होणार असून याचे यजमानपद (बीसीसीआय) भारताकडे असणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.

आयपीएलचे दुसर्‍या टप्प्यातील सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान युएईमध्ये होणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसानंतर 17 ऑक्टोबरपासून टी -20 वर्ल्ड कप आयोजित केला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. टी -20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकांसंबंधीचा अंतिम निर्णय आयसीसीकडून घेतला जाईल. अहवालानुसार अबू धाबी, शारजाह आणि दुबईमध्ये टी -20 वर्ल्डकपचे सामने आयोजित केले जातील. गेल्या वर्षी कोरोना साथीमुळे आयसीसीने ऑस्ट्रेलियामधील प्रस्तावित 2020 टी -20 वर्ल्डकप पुढे ढकलला होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्डकप भारताबाहेर होणार हे आधीच बोललं जात होतं. दुबईत ही स्पर्धा हलवली जाऊ शकते अशीही चर्चा होती, ती खरी ठरली. आयपीएल स्पर्धा संपताच टी - 20 वर्ल्डकप सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

एकूण 45 सामने खेळवले जाणार

टी -20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघांना संधी देण्यात आली आहे. एकूण 45 सामने होणार आहेत. पहिली फेरी 8 संघांमध्ये असेल. दोन गटात 4--4 संघ असतील. एकूण 12 सामने होणार आहेत. दोन्ही गटातील अव्वल संघ सुपर-12 साठी पात्र ठरेल. येथे 12 संघ दोन गटात विभागले जातील. एकूण 30 सामने होणार आहेत. यानंतर दोन सेमीफायनल आणि फायन सामना होईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.