सुमित दंडुके: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथे अटल बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले. जगातील सर्वात लांब महामार्गावरील बोगदा आहे. त्याची लांबी ९.०२ किमी आहे. या बोगद्यामुळे आता मनाली आणि लाहौल-स्पीती ही खोरी वर्षभर जोडली जाणार आहेत. यापूर्वी, बर्फवृष्टीमुळे दरवर्षी सुमारे सहा महिने दरी खोदली गेली जात होती.
बोगद्यामुळे मनाली ते लेह दरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने तर वेळ सुमारे चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. पीरपंजाल डोंगररांगांना भेदून ३,३०० कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. दरम्यान, रोहंताग पासजवळ एक ऐतिहासिक बोगदा बनवण्याची घोषणा स्वत: वाजपेयी यांनी ३ जून २००० साली केली होती. तो आता वाहतुकीसाठी खुला आला आहे. सद्यस्थितीत भारत-चीनदरम्यान ताणलेले संबंध आणि युद्धजन्य स्थिती त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला हा बोगदा वरदान ठरणार आहे.
जगातील सर्वात लांब महामार्गावरील बोगदा ते पण भारतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी दहा वाजता हिमाचल प्रदेशमधील रोहतांग येथे अटल बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले.

Loading...