११ के.व्ही.च्या लाईनचा मुख्य विद्युत पोल तुटला.

1 min read

११ के.व्ही.च्या लाईनचा मुख्य विद्युत पोल तुटला.

महावितरणच्या माध्यमातून लोकांच्या जिविताशी खेळण्याचे प्रकार चालू असून नेमलेले कर्मचारी काय करतात? दशनाम युवक प्रतिष्ठानने वेधले लक्ष.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: महावितरणच्या माध्यमातून लोकांच्या जिविताशी खेळण्याचे प्रकार चालू असून नेमलेले कर्मचारी काय करतात? असा सवाल दशनाम युवक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील(भैय्या)भारती यांनी उपस्थित करत बऱ्याच लोकांचे जीव विद्युत विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेले आहेत. तरीही महावितरणकडून त्यांच्या परभणी विभागाचे कामकाजात सुधारणा होत नसल्याने युवक प्रतिष्ठानने मानवत तालुक्यातील खडकवाडी येथून जाणाऱ्या ११ के.व्ही.च्या लाईनचा मुख्य विद्युत पोल व्ही.क्रॉस जवळ तुटला असल्याने बदलण्याची मागणी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन त्यांनी जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता यांना दिले असून. त्यांनी लूज असणाऱ्या तारा आणि तुटलेले चालू लाईनचे पोल या विषयावर लक्ष वेधून दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष स्वप्नील(भैय्या)भारती,कोषाध्यक्ष सुरेश पुरी,उपतालुकाध्यक्ष राजेश पुरी,तुकाराम मसलकर,लक्ष्मण भारती,अजय भारती यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.