कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारपेठ राहणार सात दिवस बंद.

1 min read

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारपेठ राहणार सात दिवस बंद.

प्रशासनाकडून उपाययोजना करूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याने घेतला निर्णय.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णसंख्येने वातावरण हतबलमय झाले आहे. या आजारामुळे भयग्रस्त लोक मोठ्या व्याधीने त्रस्त होत असल्याचे, प्रकारही समोर येत असतानाच सोनपेठ येथील व्यापारी महासंघाने सोनपेठची व्यापारपेठ 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत सात दिवस बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ प्रशासनाकडून उपाययोजना करूनही कोरोना आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सुरक्षिततेचे नियम पाळूनही ग्रामीण भागातील लोकांची गर्दी टळत नसल्याने सोनपेठच्या व्यापारी महासंघाने याबाबत एक बैठक आयोजित करत, सात दिवसाचा बंद पाळण्याचे ठरवले आहे.
याबाबतचे अधिकृत निवेदन व्यापारी महासंघ बुधवार 16 सप्टेंबर रोजी सोनपेठचे तहसीलदार यांच्याकडे देणार असल्याचे व्यापारी महासंघाकडून कळविण्यात आले आहे. या बैठकीस सर्व स्तरातील व्यापारी यांच्यासह सह सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.