घाटीचा भोगंळ कारभार, चक्क बाळच पळविले

परिचारिका व मावशीच्या मदतीने आईला मिळाले नवजात शिशू

घाटीचा भोगंळ कारभार, चक्क बाळच पळविले

सुमित दंडुके / औरंगाबाद : घाटीतून नवजात शिशूला पळविल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि.२३ रोजी सकाळी घडली. या घटनेने घाटी रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती.

बाळाची आई (सोनाली दिगंबर हराळे, रा.लिम्बेजळगाव) आणि आजी कपडे बदलण्यासाठी गेल्याची संधी साधुन एका महिलेने नवजात शिशूला पळवून नेले होते.बाळाची आई परत आल्यानंतर बाळ जागेवर न दिसल्याने त्यांनी हंबरडा फोडला. त्यामुळे लगेचच परिचारिका आणि मावशीनी बाळाची शोधाशोध सुरु केली.

नवजात शिशू आणि आई

त्यांनी लगेचच घाटीच्या बाहेर येत रिक्षाचालकांना विचारपूस केली, तेव्हा एक महिला बाळाला घेऊन उस्मान खान यांच्या रिक्षात बसून गेल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ उस्मान खान यांच्याशी संपर्क साधुन त्या महिलेला कुठे सोडले याची माहिती घेतली आणि लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. तिकडे गेल्यावर एका घरात हे बाळ आढळून आले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. या महिलेला लगेच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरील आरोपी कविता मुगदल हिला बेगमपूरा पोलीसांच्या स्वाधीन केल्यानंतर तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला करून न्यायालयात हजर केले असता. तिच्याकडून यापूर्वीही असे गुन्हे घडले आहेत का? आणि यामागे तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बाळाला शोधणा-या परिचारीका, मावशी आणि विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.