संसदेचं पावसाळी आधिवेशन १९ जूलैपासुन होणार

संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहांचे कामकाज हे सकाळी ११ ते सायंकाळी ६पर्यंत चालेल

संसदेचं पावसाळी आधिवेशन १९ जूलैपासुन होणार

नवी दिल्ली : यंदा संसदेचं पावसाळी आधिवेशन १९ जूलै ते १३ ऑगस्ट पर्यत पार पडणार आहे. याबातची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. या अधिवेशानत १९ दिवसाचे कामकाज पार पडणार आहे.

कोविड-१९ संदर्भात RT-PCR चाचणी अनिवार्य नाही मात्र ज्‍या सदस्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही त्‍यांनी चाचणी करुनच सभागृहात प्रवेश करावा, असे आवाहनही लोकसभा अध्‍यक्षांनी केले आहे.

यंदा पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडे बरेच मुद्दे आहेत. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, महागाई यांसोबतच उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत हिंसाचार, लसीकरणाची ढिम्म गती किंवा करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारची तयारी अशा अनेक मुद्यांना सरकारला सामोरं जाव लागणार आहे. यासोबतच, वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा संसदेत निनादू शकते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.