जगातील आश्चर्यचकीत करणारे तलाव

1 min read

जगातील आश्चर्यचकीत करणारे तलाव

ही पृथ्वी आश्चर्यकारक दृश्यांनी परिपूर्ण आहे. येथे असे तलाव आहेत, ज्यांचे सौंदर्य लोकांना आश्चर्यचकित करते. आज तुम्हाला अशाच काही विचित्र तलावांबद्दल सांगणार आहोत.

स्पॉटेड लेक, कॅनडा

हे कॅनेडियन स्पॉटेड लेक आहे. हे खारे पाण्याचे तलाव खनिजयुक्त लवणांनी भरलेले आहे, ज्यात सल्फेट, चांदी आणि टायटॅनियम आहे. उन्हाळ्यात या तलावाचे पाणी सुकते तेव्हा इथले आश्चर्यकारक दृश्य दिसते. हा तलाव स्थानिक पातळीवर कलीलूक म्हणून ओळखला जातो. येथील लोकसुद्धा या तालावाला घाबरतात. कारण पहिल्या महायुद्धात स्फोटके तयार करण्यासाठी या तलावाच्या क्षाराचा वापर केला जात असे.

कानो क्रिस्टेल्स, कोलंबिया

हे कोलंबियातील कानो क्रिस्टेल्स आहे, म्हणजेच ही एक नदी आहे, ज्याचे पाणी लाल, हिरवे, निळे आणि नारंगी रंगाचे दिसते. याचे खरे रहस्य म्हणजे क्लेवेगरा प्रजातीचे एक झाड आहे ज्यामुळेच सप्टेंबर पासून तर नोव्हेंबर पर्यत येथील पाण्याला इंद्रधनुष्याचे रंग म्हटले जाते.

उकळता लेक, डोमेनिका

हे एक उकळत्या पाण्याचा तलाव आहे, जे कॅरेबियन देश डोमेनिकामधील मोरन ट्रोइस पिट्नस राष्ट्रीय उद्यानात आहे. खरं तर, तलावाचे पाणी उकळत राहते कारण त्या खाली स्मोल्डिंग लावा आहे. अशा परिस्थितीत या तलावाच्या पाण्यात पोहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रित करण्यासारखे आहे.

पिच लेक, त्रिनिदाद

हे काळ्या रंगाचे तलाव त्रिनिदाद आणि टोबॅगो या कॅरिबियन देशात आहे. हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक डांबर आणि डांबराचा साठा आहे. असा अंदाज आहे की या तलावामध्ये एक कोटी टन अलकतारा आहे. सुमारे शंभर एकरांवर पसरलेला हा विलक्षण तलाव २५० फूट खोल आहे.

केलिमूटू क्रेटर लेक, इंडोनेशिया

इंडोनेशियाच्या केलिमूटू ज्वालामुखीच्या वरती तीन तलाव आहेत. याला केलिमूटू क्रेटर लेकच्या नावाने ओळखले जाते. विशेष म्हणजे ही तीनही तलाव वेगवेगळ्या रंगांची असून ते रंगही बदलतात. जसे की, या तलावाचे पाणी निळ्यापासून हिरवे, लाल, काळे आणि तपकिरी रंगाचे होत जाते. याचे एक वैशिष्ट्य असे आहे की, तीन्ही तलावाच्या पाण्याचे तापमान आणि रासायनिक गुण वेगवेगळे आहेत.

शैंपेन पूल, न्यूझीलॅंड

न्यूझीलॅंडमधील या तलावाला शॅपेंन तलाव म्हणून ओळखले जाते. कारण या पाण्यात शॅपेंन सारखेच कार्बन डायऑक्साइडचे बुडबुडे नेहमीच येत असतात. सुमारे ९०० वर्षापुर्वी अस्तित्वात आलेल्या या तलावाच्या पाण्याचे तापमान ७४ डिग्री सेल्सियस असते. असे म्हणतात की, या पाण्यात आर्सेनिक आणि अँटीमोनी सल्फाईड उपलब्ध आहे.