सात वर्षाच्या मुलीसह आईने रॉकेल ओतून पेटवून घेतले.

1 min read

सात वर्षाच्या मुलीसह आईने रॉकेल ओतून पेटवून घेतले.

हुलसूर तालुक्यातील गडीगौडगाव येथील हृदयद्रावक घटना.

बिदर: मुंबई वरून नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गडीगौडगावला आलेल्या महिलेला पोटदुखीच कारण देत, विधीसाठी येऊ न दिल्याने सदरील महिलेने राग मनात धरत घरात कोणी नसताना. आपल्या सात वर्षाच्या मुलीसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत, आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बिदरच्या हातनुर येथील गडीगौडगाव येथे घडली आहे.
अविशा(वय.३०) व मुलगी प्रद्नया(वय.७) असे मृत पावलेल्या दोघी मायलेकींच नाव आहे. आठ वर्षांपूर्वी गडीगौडगाव येथील प्रदीप वानखेडे यांच्याशी अविशाचा विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी व मुलगा असे दोन अपत्य होते. सदरील घटनेदरम्यान मुलगा हा बाहेर खेळत असल्याने तो वाचला. अविशाला पुर्वीपासूनच पोटदुखी व मानसिक त्रास होता. त्यातुनच हे कृत्य केले असावे असे पोलीसांनी सांगितले.