तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच नाव डांबराने लिहिलं जाईल- भातखळकर

ओबीसी आरक्षणासाठी १०६ आमदारांचं निलंबन केलं तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू...

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच नाव डांबराने लिहिलं जाईल- भातखळकर

मुंबई : राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात आशिष शेलार, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, गिरीश महाजन, अतुल भातखळकर यासह अन्य आमदारांचा समावेश आहे. यात निलंबित आमदार अतुल भातखकर यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

भातखळकर म्हणाले की, तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल. धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केलीय. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो, पण शिवसेना, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझं निलंबन करण्यात आलंय. ओबीसी आरक्षणासाठी १०६ आमदारांचं निलंबन केलं तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचं संख्याबळ कमी झालं असलं तरी अकेला देवेंद्र काफी है, अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.