बँक कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा भोवला

पूर्णा येथील एटीएम चोरी प्रकरण..

बँक कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा भोवला

परभणी : पूर्णा येथील एटीएम मशीनमधून हातोहात फसवणूक करून बँक खात्यातील १ लाख २० हजार रुपये काढून फसवणुक केल्याचा प्रकार बुधवार, ३ मार्च रोजी घडला. यानंतर फिर्यादी स्वत: बँकेकडे गेले. त्यांनी सदर प्रकार बँक कर्मचार्‍यांना सांगीतला. परंतु बँक कर्मचार्‍यांनी हा प्रकार गांभिर्याने घेतला नसल्याचे दिसून आले. या प्रकरणी या बँक कर्मचार्‍यांची चौकशी करण्याची मागणी सुहागण येथील मारोती भोसले यांनी बँकेच्या मुख्य शाखा व्यवस्थापकाकडे केली आहे.

सुहागन येथे राहणारे मारोती भोसले हे पूर्णेतील एका आडत दुकानावर मुनीम म्हणून काम करतात. मंगळवार, २ मार्च रोजी त्यांचे एटीएम कार्ड एका भामट्याने हातोहात पळवले होते. त्यानंतर पूर्णेसह विविध ठिकाणाहून सुमारे २०-२० हजार रुपये असे एकूण १ लाख २० हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. मंगळवार, २ मार्च रोजी भोसले यांच्या खात्यातून ४ हजार रुपयांची रक्कम पाचवेळा काढून घेतली. याचा संदेश भ्रमणध्वनीवर भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ बँकेकडे सुमारे दीड वाजेच्या सुमारास धाव घेतली. बँकेतील कर्मचारी अक्षय डहाळे यांना घडलेला प्रकार सांगीतला. परंतु त्यांनीही हे प्रकरण गांभिर्याने न घेता, ‘हे पैसे तुमच्या खात्यात चोविस तासात जमा होतील’ असे उत्तर दिले. त्यानंतर मारोती भोसले यांना १ लाख २० हजार रुपयांचा फटका बसला. बँक कर्मचार्‍यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता, असेही भोसले निवेदनात म्हणत आहेत. या बँक कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी, यासाठी बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक आणि पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे म्हटले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.