मास्क न घातलेल्या नायब तहसीलदारास नगरपालिकेने ठोकला दंड

निलंगा नगरपालिकेने नायब तहसिलदार यांनी मास्क घातला नाही म्हणून चक्क दंड ठोकल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

मास्क न घातलेल्या नायब तहसीलदारास नगरपालिकेने ठोकला दंड

निलंगा: निलंगा नगरपालिकेने नायब तहसिलदार यांनी मास्क घातला नाही म्हणून चक्क दंड ठोकल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

निलंगा तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार अनिल धुमाळ हे आपल्या गाडीवर घराकडे जात होते. शहरातील शिवाजी चौकात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी थांबवून मास्क न वापरल्यामुळे त्यांच्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वय शंभर रूपयांचा दंड भरून घेतला व मास्क वापरण्याची विनंती करून त्याना सोडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला उधान आले असून संपूर्ण शहरातील चौकात व मुख्य रस्त्यावर विना मास्क फिरणा-यावर नगरपालिका कडक निर्बंध घालत आहे. पोलिस प्रशासन व नगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईमुळे शहरात विनाकारण व विना मास्क फिरणा-या नागरिकांना नियमाचे पालन करण्यास भाग पडावे लागत आहे.

मागील अठवड्यात शहरातील व्यापारी नागरिक यांच्यावर स्वत: निवासी जिल्हाधिकारी लातूर व उपविभागीय अधिकारी विकास माने तहसिलदार गणेश जाधव यानी शहरात फिरून विना मास्क दुकानात बसलेल्या व्यापाऱ्यांना व व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यांच्याकडून ४ हजार पाचशे रूपयांची वसूली देखील केली होती.
वरिष्ठ अधिकारीच असे कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून विना मास्क फिरत असतील तर सर्वसामान्य जनतेने त्यांचा काय आदर्श घ्यावा अशी चर्चा सध्या शहरात चालू आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.