देशात नवीन कोरोना रुग्णसंख्या ४० हजार खाली

डिसेंबर महिन्यापर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण

देशात नवीन कोरोना रुग्णसंख्या ४० हजार खाली

नवी दिल्ली देशातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत आता घट होताना दिसत आहे. काल दिवसभरात देशात ३९ हजार ७९६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर ४२ हजार ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ७२३ लोकांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला. कोरोनाबाधित मृतांची संख्या एक हजारांच्या आत नोंदली जात आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय असल्याचं तज्त्रांचं मत आहे. आतापर्यंत देशातील ३५ कोटी २८ लाख ९२ हजार ०४६ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस घेतला आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेला गती आली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी
राज्यात रविवारी ९,३३६ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर नवीन ३,३७८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५८,४८,६९३ रुग्ण बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १,२३,२२५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९१ टक्के झाले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.