तिसऱ्या लाटेची शक्यता, दीडपट अधिक ऑक्सिजनची तयारी

विभागीय आयुक्तांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक

तिसऱ्या लाटेची शक्यता, दीडपट अधिक ऑक्सिजनची तयारी

औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचा तुटवडा, रेमडेसिबिर, फॅविपिराविर, टॉसिल्युझुमॅब या औषधांचा पुरवठा, खाटांची कमतरता यामुळे झालेल्या बदनामीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमध्ये कसे बदल करावेत, याच्या नव्याने तयारीला प्रशासन लागले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टिपेला असताना मराठवाड्यात २७० मे. टन प्राणवायूची आवश्यकता लागली. तिसऱ्या लाटेत तो ४०० टनांपर्यंत असेल आणि द्रवरूप प्राणवायू साठवणुकीची क्षमता १२०० मे. टनांपर्यंत वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १५ ऑगस्टपर्यंत प्राणवायूच्या टाक्या भरून घेण्यापासून ते रुग्णालयनिहाय प्राणवायू वापराची गणिते केली जात आहेत. आरोग्य विभागाच्या सचिवाने तयारीच्या अनुषंगाने लिहिलेल्या पत्रानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या अनुषंगाने बैठक घेतली आहे. दरम्यान, तालुका पातळीवर प्राणवायू पुरवठादार वाढविण्याचेही प्रयत्न केले जात आहे. ऑगस्ट महिन्यात तिसऱ्या लाटेचे अंदाज बांधले जात आहेत.

मराठवाड्यात तालुका पातळीवर प्राणवायू पुरवठादार नाहीत. त्यामुळे जिल्हा स्थानापासून लांब असणाऱ्या तालुक्यात ऑक्सिजन टाक्या भरून देणाऱ्या पुरवठादार एजन्सींचे अर्ज तातडीने मंजूर केले जाणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने तशी तयारी सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, लातूर जिल्ह्यातील उदगीर, जालना जिल्ह्यात भोकरदन येथे प्राणवायू टाक्या पुरर्णभरण करून देणाऱ्या एजन्सी वाढवाव्यात तसे परवाने तातडीने देण्याविषयीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, उस्मानाबाद व नांदेडमधून कर्नाटकातील बिदर आणि आंध्र प्रदेशात होणारा प्राणवायूचा पुरवठा कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या कालावधीमध्ये प्राणवायू आवश्यकता टिपेला असताना २७० मेटन प्राणवायू प्रतिदिन लागत होता. ती आवश्यकता दीडपटीने वाढविण्यात आली असून तिसऱ्या लाटेत ४१२ टन प्राणवायू लागेल अशी तयारी केली जात असून प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून तालुका पातळीवर टाक्या पुरविण्यासाठीचे नियोजन केले जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.