'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चा दमदार ट्रेलर, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

अजय देवगण, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क, नोरा फतेही आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत...

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया'चा दमदार ट्रेलर, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

बॉलीवुड स्टार अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांचा आगामी चित्रपट 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहे. अजय देवगण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याअगोदर डिस्ने + हॉटस्टारने नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये थरारक घटनांचे सीक्वेन्स, भावनांच्या अनेक छटा, देशप्रेम आणि भुजमधील लोकांची एकता प्रतीत होत आहे. ट्रेलर सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ट्रेलर पाहताना एकदाही कंटाळा आल्यासारखं वाटत नाही. ट्रेलरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ट्रेलरमधील डायलॉग्स. प्रेक्षकांना खिळवूण ठेवण्यात सर्वात मोठी भूमिका हे डायलॉग्स बजावत आहेत. अशातच अजय देवगणला सैनिकाच्या भूमिकेत पाहूनही चाहते खूश झाले आहेत. तसेच संजय दत्त यांचीही भूमिका लक्ष वेधून घेते.

- बघा चित्रपटाचा ट्रेलर

१३ ऑगस्ट २०२१ रोजी रिलीज होणार चित्रपट
यावर्षीचा बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक असलेला ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ १३ ऑगस्ट २०२१ रोजी रिलीज होणार आहे. अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणारा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

सत्य घटनेवर आधारीत
हा चित्रपट १९७१ च्या सत्य घटनेवर आधारित आहे. जेव्हा पाकिस्तानने भारताच्या एअरबेसवर हल्ला केला होता. एअरबेसवर ९२ बॉम्ब आणि २२ रॉकेटने हल्ला करण्यात आला होता. अशा परिस्थिती भारतीय हवाई दलाच्या शूर अधिकाऱ्याने आपल्या धैर्याने एअरबेस वाचवलाच. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नवीन हवाई पट्टी रात्रीत तयार केली. विजय कर्णिक असे अधिकाऱ्याचे नाव होते. अजय देवगण चित्रपटात तीच भूमिका साकारत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.