प्रिंट मिडिया देखील फसवा

सोशल मिडियावर फसवा असा आरोप करणारा प्रिंट मिडिया देखील आपल्या वाचकांची अशीच फसगत करत आला आहे. फसव्या जाहिराती देऊन मटक्याचे आकडे छापून वाचकांची फसगत नाही तर लुट केली आहे. नक्की वाचा हा पहिला भाग

प्रिंट मिडिया देखील फसवा

माध्यम जगतात आता समाज माध्यमे आणि नियमित माध्यमे यात स्पर्धा लागली आहे. तुलनेत स्वस्त आणि अनेक लोकांच्यापर्यंत पोहचणारे समाज माध्यम लोकप्रिय झाले आणि लोकांचा माध्यमावरील विश्वास कमी होऊ लागला. मजकुराची खात्री आणि संपादन याविषयी समाजमाध्यमात फारशी संधी नसल्याने समाजमाध्यमे विश्वसनीय ठरली नाहीत आणि याचाच लाभ उठवत मुद्रीत माध्यमांनी समाजमाध्यमे विश्वसनीय नाहीत अशी हाकाटी पिटायला सुरूवात केली. जमेल तिथे आणि जमेल तेंव्हा सोशल मिडियाची बदनामी केली जाते.
सोशल मिडिया (social media) विश्वसनीय नाही. तो फेक न्युज देतो. सोशल मिडियात फसवणुक होते. अशी आरोप बातम्यांच्या स्वरूपात करत प्रिंट मिडिया विश्वसनीय असल्याचा दावा केला जातो. फेसबुकवर फसवले, व्हाटसएप वर फसवले गेले (cheating on facebook and whatsapp) अशा बातम्या नेहमीच दिसतात. याचसोबत आंबट मजकुर या माध्यमातून पसरवला जातो असा आरोप देखील होत असतो.
माध्यम समुहाचे मालक (ownerof media house) नेहमीच या चर्चा घडवून आणत असतात. आणि मुद्रीत माध्यमे विश्वसनीय असल्याची (fiathful print media) चर्चा घडवून आणत असतात. पण खरेच तसे आहे का? ( isrealy print media faithful) या प्रश्नाची उत्तरे मिळवायची असतील तर आपल्याला मुद्रीत माध्यमातील कांही बाबी समोर आणायला हव्यातच.
जरा एक एक विषय बघू की प्रिंट मिडियाने लोकांची कशी फसवणुक केली आहे. (how print media cheats reader)

sex-advt
जाहिरात व्यवसायाच्या नावाखाली प्रिंट मिडियाने केलेली फसवणुक केली आहे हे आपल्या लक्षात येईल
आपल्याला कांही वर्षापूर्वी बिहार मधील कतरीसराय जि. गया ( बिहार ) येथून प्रकाशीत होणा-या जाहिराती आठवत असतील. लिंगवर्धक यंत्राच्या आता ठिकाण बदलले आहे पण जाहिराती मात्र कायम आहेत. कंपनी आणि नाव बदलून. वर्तमानपत्रात जाहिराती येतात म्हणून अनेकांनी अशी यंत्र खरेदी केली आहेत. आणि लोक फसले आहेत. वर्तमानपत्रासाठी हा जाहिरात व्यवसाय झाला पण त्यावर विश्वास ठेवणा-या वाचकांची मात्र फसगतच झाली. आधी टपाल कार्यालयात अशी हजारो पार्सल येत होती. आता कोरीयर कंपण्या ही पार्सल वाटप करत असतात. अशा जाहिराती प्रकाशीत करून वाचकांची फसगतच होत असते. ( lingwardhak yantra from katarisaray gaya) तशी फसगत झाली आहे पण प्रिंट मिडियावाले ही जबाबदारी स्विकारायला तयार होत नाहीत.
लक्ष्मी कुबेर यंत्र आणि ताईत (lakshmi kuber yantra and pendent)
या प्रकारातील जाहिरात तर वर्तमानपत्र आणि खासगी वृत्तवाहिन्यावर भरमसाठ दिसतात आणि दिसल्या. या अशा यंत्रांनी ना कोणी श्रीमंत झाले ना कोणाला धन मिळाले जर कोणी पैसे कमावले असतील तर ते यंत्र, गंडेदोरे उत्पादक आणि माध्यम समुहांनी पण अशा जाहिराती छापून आणि दाखवून प्रसार माध्यमांनीच पैसे कमावले आहेत. पण सोशल मिडियावर फसवल्याचा आरोप ठेवणारा मिडिया या आपणच केलेल्या आर्थिक फसवणुकीबाबत कांहीच बोलायला तयार नसतो. ही फसवणुक करोडो रूपयात झालेली आहे.
मोबाईल टॉवर आणि कर्जाच्या जाहिराती
मोबाईल टॉवर बसवून देऊ लाखोंची कमाई करा.. लाखो रूपयांचे कर्ज विना कागदपत्र अशा जाहिराती देखील आपण पेपरमध्ये बघितल्या असतील. त्या जाहिरातीवरून अनेकांची फसगत झालेली आपण अनुभवली आहे. प्रत्येक शहरात अशी गुन्हे देखील दाखल झाली आहेत. ही सामान्य माणसांची फसवणुक भामट्यांनी प्रिंट मिडियाचा आधार घेऊनच केली आहे. (cheating by advertise about mobile tower and fast laoan) पण आपल्या वर्तमानपत्राचा आधार घेऊन अशी फसवणुक झाल्याचे मुद्रीत माध्यमे कधीच मान्य करत नाहीत. खरेतर ही गुन्हेगारांना मुद्रीत माध्यमांनी दिलेली साथच आहे. संघटीत गुन्हेगारीचे गुन्हे यांच्यावरती दाखल व्हायला हवेत.
मटक्याचा गुन्हा

matka-advt
मटका एक मोठा गुन्हेगारीचा व्यवसाय आहे. ज्याची आकडे मोठमोठी दैनिक साप्ताहीक चार्ट आणि रोजचे आकडे छापून पेपरवाले यात सहभागी होत आले आहेत. औरंगाबाद, सोलापूर पुणे आणि मुंबई येथून प्रकाशीत होणा-या अनेक दैनिकांनी बिनधास्त मटक्याचे आकडे छापून गुन्हा केला आहे. आणि गुन्हेगारांना सहकार्य केले आहे. गोव्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेकांनी हे धंदे बंद केले. गरीबांच्या कमाईचे कष्टाचे पैसे मटका बुक्की चालवणा-या मंडळीच्या घसात टाकून आपण पैसे कमावत आहोत. आणि आपल्या भाबड्या वाचकांची फसवणुक करत आहोत याची जाणिव देखील या मंडळीना नसावी याचे आश्चर्य आहे. खरे तर आश्चर्य वाटावे असे कांहीच नाही. कारण आपल्या तुंबड्या भरण्यासाठी हे असे कृत्य करत असतात. आश्चर्य याचे आहे की, एवढे काळे धंदे असून देखील ही मंडळी सोशल मिडियाला बदनाम करत असतात.
आता फसवणुक कोण करते याचा निर्णय वाचकांनीच घ्यायचा आहे. यांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. हे केवळ वाचकांची नव्हे तर सरकारची देखील फसवणुक करत असतात. डीजीआयपीआर आणि एबीसी घोटाळा आहेच. शिवाय वृत्तपत्रांचा आंबटशोकीन बातम्यांचा प्रवाह देखील आहे. ते बघुया पुढच्या भागात.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.