जिल्हा रुग्णालयातील इमारतीचे छत कोसळले

बालरुग्ण उपचार कक्षाच्या इमारतीच्या प्लास्टरचा काही भाग कोसळल्यामुळे विभाग स्थलांतर करण्याच्या तयारीत प्रशासन

जिल्हा रुग्णालयातील इमारतीचे छत कोसळले

परभणीः जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील बालरुग्ण उपचार कक्षाच्या इमारतीच्या प्लास्टरचा काही भाग कोसळल्याची घटना मंगळवार रोजी घडली. यावेळी कक्षामध्ये उपचार घेत असलेले १४ रुग्ण सुरक्षीत असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असून धोकादायक प्लास्टर काढून टाकण्यात येणार असून सध्या ही इमारत इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या रुग्णालय प्रशासनाच्या हालचाली सुरु आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचवल्यानुसार विविध कामे करण्यात येणार असून इमारतीची चाचणी करून धोकादायक प्लास्टर काढून टाकणार असल्याची माहिती आहे. रात्रीच्यावेळी छताचे प्लास्टर कोसल्यानंतर एका उपचार सुरु असलेल्या १२ वर्षीय मुलाने याची माहिती आईला दिली. याचवेळी प्लास्टरचा मोठा तुकडा बेडवर पडला. यामध्ये हा रुग्ण बचावला. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डॉ.प्रकाश डाके यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सदर इमारत इतरत्र स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाच्या मागे शुक्लकाष्ट लागलेले आहे. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दोनवेळा आग लागल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर रुग्णालयाने फायर ऑडिट केले होते. आता छताचे प्लास्टरच कोसळल्याने पून्हा एकदा रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.