शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार

आ. डॉ. राहूल पाटील यांच्या मागणीला यश

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणार

परभणी : शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे़ यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांच्यावर अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे़. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत २५ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे़.

या बैठकीस कृषीमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपिस्थत होते़. या संदर्भात परभणीचे शिवसेना आ़. डॉ़. राहूल पाटील यांनी शालेय व माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमात कृषी विषय अनिवार्य करण्यात यावा अशी मागणी करीत वारंवार पाठपुरावा केला होता़ शासनाने या पार्श्वभुमीवर कृषी विषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतल्याने आ़. पाटील यांच्या मागणीला यश आले आहे़.

gffghfh-7

भारत हा कृषी प्रधान देश असून देखील शालेय व माध्यमिक शिक्षणामध्ये कृषी विषय नाही याची खंत युनिर्व्हसिटी ग्रँट कमिशन २०१७च्या अहवालात व्यक्त करण्यात आली होती़ या अहवालानुसार उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर सर्वात जास्त म्हणजे १ कोटीपेक्षा जास्त म्हणजे ३६ टक्के मुले कला शाखेत, त्या पाठोपाठ विज्ञान शाखेत १९ टक्के तर वाणिज्य शाखेत १६ टक्के विद्यार्थी शिक्षण घेतात़ कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ०़१३ टक्के आहे़शासनाच्या या निर्णयामुळे हे प्रमाण ३ टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत होणार आहे़. विशेष म्हणजे देशाच्या जीडीपीमध्ये कृषी पेक्षा व्हेटरनरीकडून येणाऱ्या जिडीपीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात कृषी विषयाचा अंतर्भाव केल्यास कृषी व कृषी संलग्न व्यवसाय ज्यामध्ये फुलशेती, मत्स्य शेती, मधुमक्षीका पालन, पोल्ट्री इत्यादींचे शिक्षण सुरूवातीपासून मिळाल्याने अर्थार्जन वाढण्यास मदत होईल़ या नव्या कृषी क्रांतीने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत़ राज्यात सुक्ष्म सिंचन, किटक नाशके, खते-बियाणे, पीक पोषण, सेंद्रिय जैविक उत्पादने या क्षेत्रामध्ये विविध कंपन्या व उद्योगाचा मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची गरज आहे़ मात्र या संस्थांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही़ यासाठी शालेय स्तरापासून कृषी विषयाचा समावेश केल्यास कृषी क्षेत्राशी निगडीत कुशल मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध निश्चित मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांत कृषी विषयक शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण होईल
शालेयस्तरापासून कृषी विषयाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी आणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना वाढेल़ कृषी क्षेत्राशी निगडीत संदर्भ त्यांना शिकवण्यामुळे शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण होवून पीक उत्पादन पध्दतीत त्याचा उपयोग निर्माण होवू शकतो़ नवी पिढी शास्त्रीय पध्दतीने शेती व्यवसाय करू शकेल़ पर्यायाने राज्य व देशाच्या सकल उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्यामुळे शासनाच्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून शासनाचे आभार मानत असल्याचे आ़डॉ़राहूल पाटील यांनी सांगितले़


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.