दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, केजरीवालांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

1 min read

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, केजरीवालांनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये २८ ऑक्टोबरपासून कोरोनाबाधित रुग्ण संख्यात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वपक्षीय बैठकीला अरविंद केजरिवाल यांच्यासह आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, भाजपकडून आदेश गुप्ता, काँग्रेसचे अनिल चौधरी आणि जयकिशन उपस्थित आहेत. पक्षीय बैठकीला अरविंद केजरवीला यांच्यासह आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, भाजपकडून आदेश गुप्ता, काँग्रेसचे अनिल चौधरी आणि जयकिशन उपस्थित आहेत.
दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते.कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 7943 वर पोहोचली आहे. यासोबत दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येंने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. 4 लाख 52 हजार 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 42458 जणांवर उपचार सुरु आहेत.
दिल्लीतील कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.
दिल्लीत कोरोना संक्रमण वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.

देशात 83 लाख कोरोनामुक्त
भारतात बुधवारी कोरोनाचे 45 हजार 576 कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येने 89 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर, 83 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 578 झाली आहे. देशात सध्या 4 लाख 43 हजार 303 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात बुधवारी 5011 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 16 लाख 30 हजार 111 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या 80221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.