श्वेता भेंडारकर/ मुंबईः मुंबईत १० महानगरपालिकांच्या निवडणूका येत्या वर्षात होण्यार आहे. त्यामुळे सर्वंच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी गुजराती मतदारांना साद घालत मोहीम सुरु केली आहे. सर्वंच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
शिवसेना या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. शिवसेनेने गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे. तसेच शिवसेनेच्या गुजराती बांधवासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रण छापले आहे. येत्या १० तारखेला जोगेश्वरीत हा मेळावा होणार आहे. यावेळी तबल १०० गुजराती बांधव शिवसेनेत प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.

या शिवसेनेच्या टॅगलाईनवरुन सर्वच टीका करत आहेत. शिवसेनेच्या या निवडणुकीच्या रणनीतीवर मनसेचे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली आहे. ”मुंबई मा जलेबी ने फाफडा,उद्धव ठाकरे आपडा… शिवसैनिक झालाय गरीब-बापडा, सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा” असे मनसेने टोला लगावला आहे.
मुंबई मा जलेबी ने फाफडा,
— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) January 5, 2021
उद्धव ठाकरे आपडा...
शिवसैनिक झालाय गरीब-बापडा,
सत्ताधाऱ्यांना मराठी मतदारच मारतील झापडा! pic.twitter.com/5bPsAiJbgK
या सोबतच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीसुद्धा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर यांनी “कोपराला गुळ लावलं की ते चाटता ही येत नाही आणि टाकता येत नाही. तसा गुजराथी बांधवांच्या कोपराला गुळ लावण्याचा हा प्रकार आहे” मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’;मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद घालत आहेत पण गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे “मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा”असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.
કોણીએ ગોળ ચોંટાડવાનું... कोपराला गुळ लावलं की ते चाटता ही येत नाही आणि टाकता येत नाही... तसा गुजराथी बांधवांच्या कोपराला गुळ लावण्याचा हा प्रकार आहे... pic.twitter.com/GKoxF2Xgow
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 5, 2021
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 5, 2021
शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला आपटा" pic.twitter.com/yAESKdSAvw