सेनेच्या मंत्र्याने काढली काँग्रेसची इज्जत

अब्दुल सत्तारांनी शिवसैनिकांना अनेकदा शिव्या दिल्या आहेत आणि तेच आता राज्य मंत्री झाले. या राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तारांना शरद पवारांच्या विधानाचं समर्थन करावं वाटलं. समर्थन करताना सत्तार इतके घसरले की आपण काय बोलतोय याची जाणीव त्यांना राहिली नाही.

सेनेच्या मंत्र्याने काढली काँग्रेसची इज्जत

महाराष्ट्रः काँग्रेसच्या काळात कॅबिनेट मंत्री असलेले आणि शिवसेनेच्या काळात शिवसैनिकांना डावलुन राज्यमंत्री झालेले, भाजपमध्ये जाता जाता जे शिवसेनेत आले, शिवसेनेने ज्यांना हिरवा साप म्हणून फटकारलं होतं ते अब्दुल सत्तार. याच अब्दुल सत्तारांनी शिवसैनिकांना अनेकदा शिव्या दिल्या आहेत आणि तेच आता राज्य मंत्री झाले. या राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तारांना शरद पवारांच्या विधानाचं समर्थन करावं वाटलं. समर्थन करताना सत्तार इतके घसरले की आपण काय बोलतोय याची जाणीव त्यांना राहिली नाही. आपण पुर्वाश्रमीचे काँग्रेसी होतो, काँग्रेसने औरंगाबाद जिल्ह्यात आपल्याला नाकारलं म्हणून सत्तार काँग्रेसवर तोंडसुख घेते झाले.

अब्दुल सत्तारांच्या लेखी शरद पवारांच वाक्य खरं आहे, काँग्रेस रया गेलेल्या जमीनदारासारखीच झाली आहे असं ते म्हणाले पण इतक्यावरच थांबले नाहीत तर पुढेही त्यांनी काँग्रेसवर टिका करुन आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. या सरकारचं मेन फ्युज उद्धव ठाकरे आहेत आणि हे फ्युज नसेल तर काँग्रेसची अवस्था काय होईल, शिवसेनेमुळे काँग्रेसचं अस्तित्व टिकुन आहे. शिवसेना दोन्ही पक्षांचा मान सन्मान टिकवुन ठेवते असंही ते म्हणाले. इतका सगळा अपमान काँग्रेस सातत्याने सहन करते आहे. पवार जे बोलले ते चूक आहे पण विरोधकांनी त्याचा फायदा घेऊ नये असं बाळासाहेब थोरात म्हणाले. मुळात पवारांनी काँग्रेसवर टिका केली आहे त्यामुळे त्याचा त्रासही काँग्रेसलाच होणार आहे. इतरांना त्याबाबत खंत किंवा खेद असण्याचं काहीच कारण नाही.  

पवारांनी काँग्रेसवर टिका केली हे पाहुन इतरांनाही तशी इच्छा होणं सहाजिक आहे त्यामुळे काँग्रेसमधुनच मोठे झालेले लोक आता काँग्रेसवर टिका करु लागले आहेत. अब्दुल सत्तारांनी असं विधान करुनही औरंगाबादच्या किंवा राज्यातील काँग्रेसला यावर चकार शब्दही बोलावा वाटला नाही. सत्तेचा मोह आणि लाभ इतका असतो की अशा टिकांवर काही बोलावंच वाटत नाही. सत्तेला चिकटलेले मंत्री यावर बोलणार नाहीत आणि लाभ घेणारे कार्यकर्तेही यावर बोलणार नाही. काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पक्ष द्रोही ठरवलं जाईल त्यामुळे तेही गप्पच राहतील. अब्दुल सत्तारांची बोलताना इतकी जीभ घसरली की ते थेट देशमुख,गढी आणि माती या विषयांवर बोलू लागले. आपल्या लोकांचा अशा स्वरुपाने अपमान करत, टोमणे देत बोलणे ही सत्तारांची जुनीच सवय आहे. त्यामुळे या वेळीही सिल्लोडच्या देशमुखांना टोमणा मारला. पण याचा राजकारणातील कोणत्याही देशमुखांना येणार नाही कारण सत्ता आहे. शिवसेना जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या राहणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा पक्षगळतीचा धोका उद्भवणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेने कितीही टिका केली तरी ती निमुटपणे सहन करण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय नाही.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.