झोपेतल्या सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आ.मेघना बोर्डीकरांचे आमरण उपोषण!

1 min read

झोपेतल्या सरकारने डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा आ.मेघना बोर्डीकरांचे आमरण उपोषण!

आ.मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुरु केले आमरण उपोषण!

परभणी/सिध्देश्वर गिरी: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ सरसकट मदत देऊन आपले दायित्व निभावणे गरजेचे असताना, झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आजचे आमरण उपोषण असल्याचे आ. मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याच्या मागणीसाठी आग्रही असून याबाबत त्यांनी सभागृहात देखील सरकारला घेरले होते.आज त्यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

त्यांनी सरकारवर घणाघाती टीका करत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी जिल्ह्यातील भाजपचे सर्व आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून सरकारविरोधात शेतकऱ्यांचा रोष त्यांच्या माध्यमातून व्यक्त केला.या संदर्भात दिलेल्या निवेदनात आ.मेघना बोर्डीकर यांनी, गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे सर्वच पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी ऊद्धवस्त झाला,असे असताना केवळ नियमांवर बोट ठेऊन शासनाकडून परभणी जिल्ह्यातील 51 पैकी केवळ 36 महसूल मंडळांना मदतीपासुन वंचित ठेवले जात आहे. याच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांवरील अन्याया विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.

यासाठी संपुर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अतिवृष्टीमुळे दिली जाणारी मदत ही सर्वच शेतकर्‍यांना सरसगट देण्यात यावी, जे शेतकरी विमा कंपनीकडे आपल्या नुकसानाची नोंद करू शकले नाहीत त्यांचेही पंचनामे करण्यात यावेत. 2018-19 मधील कोरडा दुष्काळ न मिळालेल्या शेतकर्‍यांच्या खात्यावर हे अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी व शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी आज सोमवारपासून उपोषणास सुरवात करण्यात आले आहे . यावेळी उपोषण स्थळी मोठ्या संख्येने पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित आहेत.