मराठा सेवा संघाची सामाजीक बांधिलकी उपजिल्हा रुग्णालयात 25 ऑक्सिजन बेड देणार

तालुक्यात एकही रुग्ण उपचाराभावी दगावला जाऊ नये हीच आमची धडपड -मराठा सेव संघ

मराठा सेवा संघाची सामाजीक बांधिलकी उपजिल्हा रुग्णालयात 25 ऑक्सिजन बेड देणार

निलंगाः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वा कोरोना बाधीत रूग्णांचा वाढत असलेला मृत्यूचा आकडा या सर्व बाबीचा विचार करून मराठा सेवा संघाने निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात २५ आॕक्सीजन बेड देण्याचा सामाजिक निर्णय घेतला आहे.

दिनांक ३० रोजी मराठा सेवा संघाची एक बैठक झाली व या बैठकीत कोरोना कात रूग्णांना मदत करण्याचा निर्णय झाला.यात सर्वानुमते निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात अद्यावत २५ आॕक्सीजन बेड देण्याचा निर्णय घेतला गेला. व याबाबत तहसिलदार गणेश जाधव उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ दिलीप सौंदळे यांना यासंबंधी माहिती देण्यात आली.यावर तहसिलदार जाधव यानी २ लाख २० हजाराचे अंदाजपत्रक तयार करून देताच मराठा सेवा संघाचे दिलीप धुमाळ,जाधव एम एम,डॉ. हंसराज भोसले, डॉ. भागवत पौळ,विनोद सोनवणे,आर के नेलवाडे, डॉ. शेषराव शिंदे,कुमोद लोभे,अंबादास जाधव,डॉ. उद्धव जाधव, उदय पाटील,उत्तम शेळके,अदी पदाधिका-यांनी ही संकल्पना राबवून आर्थिक मदत जमा केली आहे.

तालुक्यात एकही रुग्ण उपचाराभावी दगावला जाऊ नये हीच आमची धडपड असे डॉ हंसराज भोसले मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष यांनी हॉस्पिटल मध्ये अत्यावशक सुविधा नाहीत म्हणून पेशंट आणि त्यांच्या नातेवाईका मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत मराठा सेवा संघ कोविड मदत निधी उभारत आहे. व निलंगा तालुक्यातील कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करीत आहे. दोन चार दिवसात नविन 25 बेड चे सर्व सुविधाने युक्त सेंटर उभे होईल. पूर्वीचे 80 बेड आणि आणि आता नविन 25 बेड मिळून तलुक्यात 105 बेड असलेले एक सर्व सुविधा युक्त रुग्णालय वैधकीय कर्मचाऱ्यांसह सज्ज करण्याचा आमचा माणस आहे.

कुठलाही राजकीय हेतू न ठेवता फक्त सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही मदत करत आहोत.त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे ते समाज बांधव आत्मिक जिव्हाळ्यातून करत आहेत.त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे करावे तितके कौतुक कमी आहे. सर्वांचे माणावा तेवढे आभार कमी आहेत. अशा कठीण प्रसंगात मराठा सेवा संघ मदत करत आहे. याचा आनंद आहे. आणखीन मदत कार्य सुरुच आहे. आम्ही कमी पडणार नाही, तालुक्यात एकही रुग्ण उपचाराभावी दगावला जाऊ नये हीच आमची धडपड आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.