काँग्रेसची अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर कार्यालयाच्या उदघाटनाला प्रदेश सरचिटणीसच गैरहजर

निलंगा शहरात काँग्रेसचे दोन संपर्क कार्यालय, शहरातील काँग्रेस मध्ये नुकतेच दाखल झालेले अभय साळुंके यांना देशमुख गटाकडून अधिक पसंती मिळत असल्याने निलंगेकर गट नाराज असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसची अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर कार्यालयाच्या उदघाटनाला प्रदेश सरचिटणीसच गैरहजर

माधव पिटले/निलंगा: जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अयोजित केलेल्या विविध कार्यक्रमास निलंगेकर गटाने पाठ फिरवल्याने काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ही गटबाजी संपण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी हस्तक्षेप करणार का? असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. शहरातील काँग्रेस मध्ये नुकतेच दाखल झालेले अभय साळुंके यांना देशमुख गटाकडून अधिक पसंती मिळत असल्याने निलंगेकर गट नाराज असल्याचे चित्र आहे. संपर्क कार्यालय उदघाटनासाठी शहरात लागलेले बॅनर व वृत्तपत्रातील जाहिराती मध्ये काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असतानाही त्यांना डावलण्यात आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
nilnga_congress_offifce
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दहा वेळा निलंगा विधानसभेचे प्रतिनिधित्व केल्यामुळे प्रदेश कार्यकारणी व केंद्रीय कार्यकारणीत चांगले संबंध होते. त्यांचा जिल्ह्यासह निलंगा मतदार संघात वेगळा दबदबा होता. आजही डॉ.निलंगेकर यांचे राजकीय वारस म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणूनच मागील दोन विधानसभा निवडणूकीत मोठे मताधिक्य मिळाले होते. शिवाय तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध कार्यकारी सोसायटी व शैक्षणिक संस्थामुळे निलंगेकर गटाकडे मोठा जणाधार आहे.

अवघ्या दिडवर्षापूर्वी मनसेतून शिवसेनेत व शिवसेनेतून काँग्रेसमध्ये बेडूक उड्या मारलेले अभय साळुंके यांना देशमुखाच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला होता. डॉ निलंगेकर हे उच्च शिक्षित असल्यामुळे दुरदृष्टी व धूर्त नेते असल्यामुळे थिल्लर कार्यकर्त्यांना कधीही पक्षात स्थान दिले नाही. परंतु अभय साळुंके यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निलंगेकराना पर्याय शोधणा-या देशमुखांना कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे भविष्यात चपराक बसणार आहे. त्याचाच प्रत्यय आज काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी आला.

निलंगा जुने कॉग्रेस कार्यालय

अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे अयोजन करण्यात आले होते. तसेच काँग्रेस कार्यालयाचे उदघाटन श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, अँड.बाबासाहेब गायकवाड , सचिन दाताळ, नारायण सोमवंशी, अँड.तिरूपती शिंदे, बालाजी वळसांगवीकर, संगायो सदस्य गोविंद सुर्यवंशी, अजगर अन्सारी, गुंडेराव बिरादार, जगदिश सगर, माधव पाटील, सिद्धेश्वर बिरादार उपस्थित होते.

मात्र प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व त्यांचे समर्पक अनुउपस्थीत असल्याने अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आल्याचे दिसले. ही अंतर्गत बंडाळी भाजपच्या पथ्यावर पडणार का?. या उदघाटन प्रसंगी अभय साळुंके समर्थकांचीच हजेरी होती.

यावेळी प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील यांना संपर्क साधला असता, त्यांचा फोन बंद होता. तसेच स्व. डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे खंदे समर्थक दयानंद चोपणे यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, गेल्या 45 वर्षापासून निलंगा शहरात काँग्रेस कार्यालय आहे. हे नवीन झालेले कार्यालय नसून आयाराम गयारामासाठी केलेले संपर्क कार्यालय आहे. त्या कार्यालयाचा व आमचा काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया चोपणे यांनी एनालायझरशी बोलताना दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.