राज्य सरकारला मिळणार व्याजमुक्त लोन, केंद्रीय अर्थमंत्र्याची मोठी घोषणा.

1 min read

राज्य सरकारला मिळणार व्याजमुक्त लोन, केंद्रीय अर्थमंत्र्याची मोठी घोषणा.

12,000 कोटी रुपयांचे हे व्याजमुक्त कर्ज भांडवली खर्चासाठी राज्यांना देण्यात आले आहे. ही रक्कम राज्यांची कर्ज घेण्याच्या मर्यादेपासून दूर देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी राज्यांसाठी विशेष व्याजमुक्त कर्ज जाहीर केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. आता राज्यांना 50 वर्षे विशेष व्याजमुक्त कर्ज मिळणार आहे.

अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, 12,000 कोटी रुपयांचे हे व्याजमुक्त कर्ज भांडवली खर्चासाठी राज्यांना देण्यात आले आहे. ही रक्कम राज्यांची कर्ज घेण्याच्या मर्यादेपासून दूर देण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे व्याज मुक्त कर्ज परतफेड करण्यासाठी राज्यांना 50 वर्षे मिळतील.

या निधीचा पहिला भाग 2500 कोटी रुपये असेल, त्यापैकी 1600 कोटी रुपये ईशान्येकडील राज्यांना देण्यात येतील. तर उर्वरित 900 कोटी रुपये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशला देण्यात येणार आहेत. 1600 कोटी रुपये ईशान्येकडील 8 राज्ये मिळतील.

दुसर्‍या भागात देशातील उर्वरित राज्यांना 7500 कोटी रुपये दिले जातील. या रकमेच्या वाटपाचा निर्णय राज्यांमधील वित्त आयोगातील राज्यांच्या वाटाच्या आधारे घेतला जाईल.

केंद्र सरकार 50 वर्षांसाठी 12,000 कोटी रुपयांचे कर्ज देत आहे, पहिला आणि दुसरा भाग व्याजमुक्त असेल. परंतु ही रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावी लागेल. यातील 50 टक्के प्रथम दिले जातील. उर्वरित 50 टक्के रक्कम वापरल्यानंतर दिली जाईल.

भांडवली खर्चाच्या तिसर्‍या भागाअंतर्गत ज्या राज्यांना आत्मनिर्भर फिस्कल डिफेसिट पैकेज मधील 4 सुधारणांची पूर्तता केली, त्यांना कर्ज देण्यात येईल. यासाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.