राज्यामध्ये पुण्यात सर्वात कठोर निर्बंध

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस या बंदच ठेवण्यात येणार-विभागीय आयुक्त सौरभ राव

राज्यामध्ये पुण्यात सर्वात कठोर निर्बंध

पुणेः राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रकोप झाला आहे. रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढत चाली आहे. राज्यात सर्वत्र निर्बंध लावण्यात आले. त्यापैकी पुण्यात सर्वात कठोर निर्बंध लावले जाणार आहेत. संचारबंदीचा कालावधी हा सायंकाळी ६ ते सकाळी ६ असाच राहणार असून, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस या बंदच ठेवण्यात येणार आहेत. असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

पुण्यात काल १३ हजारांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यात सर्वांत कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे राव म्हणाले.

पुण्यासाठी हे प्रमुख निर्बंध

  • संचारबंदीचा कालावधी सायंकाळी सहा ते सकाळी सहा असाच असणार.

  • पीएमपीएलच्या बसेस बंदच ठेवणार.

  • खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करणे बंधनकारक.

  • वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमांची कार्यालये सुरू राहणार.

  • सलून, ब्युटी पार्लर, स्पा बंद.

  • लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.