संघाने सुरूकेले नाशिकमध्ये कोविड सेंटर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड सेंटर सुरु करण्यात आले

संघाने सुरूकेले नाशिकमध्ये कोविड सेंटर

नाशिकः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोचा उद्रेक वाढत चाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. तर आरेग्य व्यवस्थांवर ताण पडत आहे. अशात अनेक रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. रेमडीसीय मिळत नाही,ऑक्सीजन मिळत नाही. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून नाशिकमध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे सेंटर सुरु करण्यात आले आहे.

रविवार २५ एप्रिल पासून नाशिक मध्ये असेच एक कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रे स्वयंसेवक संघ, आयुर्वेद सेवा संघ आणि नाशिक मनपाच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या या सेंटरचे उदघाटन रविवारी झाले. नाशिक जिल्ह्याचे संघचालक विजयराव कदम आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी आनंद यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून हे उदघाटन पार पडले. या कोविद सेंटरची क्षमता ५० खाटांची आहे. नाशिक येथील रॉयल हेरिटेज हॉटेल या ठिकाणी हे सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्यव्यवस्थेवर येणार ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.