ठाकरे सरकारला संत नामदेव महाराजांचा विसर

शासकीय यादीत नामदेव महाराजांचे नावच नाही...

ठाकरे सरकारला संत नामदेव महाराजांचा विसर

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली : वारकरी संप्रदायाची पताका महाराष्ट्रातून थेट पंजाबपर्यंत घेऊन जाणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे संत परंपरेतील स्थान महत्त्वाचे आहे. असे असताना राज्यामध्ये महापुरुष व संत यांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमासंदर्भात शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये मात्र संत नामदेवांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी हा विषय येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे जाहीर केले आहे.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे जन्मलेल्या संत नामदेवांनी वारकरी संप्रदायात आपल्या अभंगातून अनेक विचार रुजविले. नामदेव महाराजांची किर्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही तर त्यांनी थेट पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाची पताका फडकवली. आजही शीख बांधवांनी मध्ये संत नामदेव महाराजांना गुरुचे स्थान देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर नामदेव महाराजांच्या अभंगांचा शीख बांधवांनी त्यांच्या धर्मग्रंथात देखील समावेश केलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांपासून ते गोरोबा कुंभार यांच्यापर्यंत अनेकांनी समाजाला भक्तीपंथाचा मार्ग दाखविला आहे. या सर्व संतांमध्ये नामदेव महाराजांचे स्थान देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

राज्यामध्ये महापुरुष व संत यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने शासकीय अभिवादन कार्यक्रम घेण्यासंदर्भात राज्य शासनाने २१ जानेवारी २०१९ रोजी आदेश पारित केले आहेत. या आदेशामध्ये महापुरुष व संतांच्या नावाची यादी प्रसारीत करण्यात आली आहे. परंतु या यादीमध्ये संत नामदेव महाराजांच्या नावाचा समावेश नसल्याची बाब श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगर यांनी समोर आणली. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी याची तातडीने दखल घेत नामदेव महाराजांच्या नावाचा समावेश करण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले आहे.
याचबरोबर हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे व माजी आमदार गजानन घुगे यांनी देखील याप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करून नावाचा समावेश करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचे सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.