बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी राष्ट्रपती कडून मिळालेल्या गोल्ड मेडलसह,सोन्याचा ऐवज लांबविला.

1 min read

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी राष्ट्रपती कडून मिळालेल्या गोल्ड मेडलसह,सोन्याचा ऐवज लांबविला.

कृषीभूषण कांतीलाल देशमुख झरीकर यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी सव्वालाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रपती कडून मिळालेले दोन गोल्ड मेडल चोरांनी लंपास केल्याची घटना घडली.

परभणी/सिध्देश्वर गिरी: जिंतूर रस्त्यावरील दत्तनगरमधील कृषीभूषण कांतीलाल देशमुख झरीकर यांच्या घराचे कुलूप तोडत चोरट्यांनी सव्वालाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रपती कडून मिळालेले दोन गोल्ड मेडल चोरांनी लंपास केल्याची घटना घडली. नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांतीलाल देशमुख झरीकर हे दत्तनगर भागात राहतात. सध्या लॉकडाऊन असल्याने कुटूंबासह ते झरी या मुळगावी गेले होते. गुरुवारी (दि.29) ते दत्तनगरातील घरी आले त्यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरात ठेवलेले सोन्याच्या वस्तूसह 20 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने नानलपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
chor2
यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी 22 ऑक्टोबर रोजी दोन अज्ञात व्यक्ती घरात गेल्याचे त्यात दिसून आले. चोरटे सीसीटीव्हीत दिसत असल्याचे पोलिस सुत्रांनी म्हटले आहे. नानलपेठ पोलिस ठाण्यात श्री. बालाजी देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून सव्वा लाखाच्या जवळपास ऐवज चोरीस गेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले रोख 20 हजार रुपयांसह दोन अंगठ्या, कानातील सोन्याचे दोन जोड, याबरोबरच मिळालेले गोल्ड मेडलही चोरट्यांनी लंपास केले.