तिसरी लाट अटळ, निर्बंध कायम असुद्या- IMA

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण आवश्यक...

तिसरी लाट अटळ, निर्बंध कायम असुद्या- IMA

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे शासनाने निर्बंध शिथील केले आहेत. कधी ३ लाखांच्या जवळ असणारी रुग्णसंख्या आता ५० हजारांच्या खाली आली आहे. तरीही हे निर्बंध शिथील न करता कायम राहूद्या असे इंडियन मेडीकल असोसिएशन (IMA) ने म्हणले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे आणि ती लवकरच येईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी इतक्यात कोरोना निर्बंधातून सूट देऊ नये, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे.

जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारी जगावर थैमान घालत आहे. जगाने कोरोना विषाणूच्या दोन लाटा पाहिल्या आहेत. आता तिसरी लाट येऊ पाहत आहे. ती अनिवार्य आहे. पण, मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला लस देऊन आणि कोरोना निर्बंधांचे पालन करुन आपल्याला तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करता येईल. यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असं आयएमए ने म्हटलं आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लोकांनी तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. लोकांनी गर्दी करणे टाळावे. पर्यटन, धार्मिक उत्सव असे कार्यक्रम आवश्यक असले तरी ते काही महिने पुढे ढकलता येतील. धार्मिक उत्सवांना परवानगी दिल्याने मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील. असे कार्यक्रम कोरोनाचे 'सुपरस्प्रेडर इव्हेंट' ठरु शकतात. त्यामुळे सरकारने आणखी तीन महिने कोरोना निर्बंधाचे काटेकोर पालन करुन लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी असा सल्ला ही आयएमए ने दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.