काळ आला होता पण वेळ आली नव्हती

पूराच्या पाण्यात वाहून गेलेले तीन शेतकरी बालबाल बचावले...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

निलंगा : मदनसुरी ते रामतिर्थ जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून जाताना तीन शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. परंतु सुदैवाने हे वाहून गेलेले शेतकरी वाचले आहेत.

गेल्या पंधरा दिवसापासून लातूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. मांजरा व तेरणा नद्या पूर्णपणे भरल्या असल्याने अनेक गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यातच दिनांक १० रोजी झालेल्या मुसळधार पावसाने निलंगा तालुक्यातील मदनसुरी ते रामतिर्थ जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पूर आला होता. अनेक शेतकरी हाताला धरून या पूराच्या पाण्यातून जात होती. अचानक हात सुटल्याने मदनसुरी येथील तीन शेतकरी या पूराच्या पाण्यात वाहून गेले. परंतु सुदैवाने सदरील वाहून गेलेले तिन्ही शेतकरी पोहत जाऊन गावापासून बऱ्याच अंतरावर सहीसलामत बाहेर निघाले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.