स्वप्नील कुमावत/ नवी दिल्लीः देशावर कोरोनाचे संकट असले तरी देखील देशाचा विकास थांबला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून अनेक विकास कामांना हिरवा झेंडा दाखवला आहे. दि. ७ जानेवारी गुरुवारी रोजी मोदींनी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मधील (WDFC) ३०६ किमी लांबीच्या रेवाडी-मदार महामार्गाचे उद्घाटन केले. तसेच विजेवर चालणाऱ्या १.५ किमी लांबीच्या जगातील पहिल्या डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेनला मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " न्यू अटेली ते न्यू किशनगड या दरम्यान सुरु झालेल्या १.५ किमी लांबीच्या या ट्रेनच्या सुरुवातीने भारत आता जगातील काही मोजक्याच प्रगत देशांच्या पंक्तीत बसला आहे. आजच्या दिवशी एनसीआर, हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मग ते पूर्व असो वा पश्चिम, केवळ मालगाड्यांना आधुनिक मार्गाची सुविधा उपलब्ध करुन देत नाहीत तर ते देशाच्या गतीशील विकासाचे कॉरिडॉर आहेत."
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे असे मार्ग आहेत ज्यावर केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्या धावतील. या आधी मालवाहतूक करणाऱ्या गाड्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या या एकाच मार्गावरुन धावायच्या. त्यामुळे मालवाहतूकीच्या गाड्यांना वाहतूकीसाठी बराच वेळ लागायचा. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे हा मालवाहतूकीच्या गाड्यांचा वाहतूक वेळ कमी झाला असून त्याचा परिणाम थेट विकासावर होत असल्याच दिसून येईल.
शेतकरी आणि शेती क्षेत्राविषयी मोदी म्हणाले.
"देशाच्या पायाभूत सुविधेला आधुनिक बनवण्यासाठी सुरु असलेल्या महायज्ञाने आता एक नवी गती प्राप्त केली आहे. गेल्या काही दिवसात आधुनिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे."
येणारा काळ हा वैभवशाली असेल-मोदी
जगातील पहिल्या डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेनला मोदींनी हिराव झेंडा दाखवला.

Loading...