उसाच्या रसाचे जबरदस्त फायदे

सर्दी आणि खोकला झाल्यास उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. तर असे काही आजार आहेत त्याच्या उपचारासाठी उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात.

उसाच्या रसाचे जबरदस्त फायदे

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने खूप नुकसान होते. उसाचा रस हा शरीरात असलेल्या पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जगभरात सर्वात जास्त ऊस हा भारतात तयार केला जातो.उसाचा रस जास्त प्यायल्यास शरीरात संसर्गजन्य शक्ती वाढण्यास मदत होते.

सर्दी आणि खोकला झाल्यास उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. तर असे काही आजार आहेत त्याच्या उपचारासाठी उसाचा रस पिण्याचा सल्ला देतात.

उसाच्या रसाचे फायदे

  • उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

  • उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.

  • उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवते. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

  • उसाचा रस तुम्हांला तुमची किडनी चांगली ठेवण्यासाठी मदत करते. उसाचा रस प्यायल्याने लघवी ही साफ होते. त्यामुळे मूतखडासारखे आजार होत नाहीत.

  • उसाचा रस लिव्हरसाठी खूप लाभदायक असतो. काविळ झालेल्या रुग्णांनी देखील उसाचा रस प्यायल्यास आराम मिळतो. उसाचा रस शरीरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर काढण्यासाठी मदत करतो.

  • उसाच्या रसात कार्बोहाड्रेट, प्रोटीन, आर्यन आणि पोटॅशियम असल्याने शरीरासाठी ते फायदेशीर ठरतात. उसाचा रस सारखा प्यायल्याने शरीर मजबूत होते आणि कार्यक्षमतेतही वाढ होते.

  • उसाच्या रसाचे सेवन केल्याने पोटासंबंधीचे सर्व रोग दूर होतात. या रसामुळे अपचनाची समस्याही दूर होते.

  • उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

  • उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

  • कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

  • उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.