बिगुल वाजलं! राज्यातील महापालिका पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर

२१ डिसेंबराला मतदान तर २२ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

बिगुल वाजलं! राज्यातील महापालिका पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर

मुंबई : राज्यातील धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोज रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशीदेखील माहिती मदान यांनी दिली या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील, असं आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम नेमका कसा असेल?
पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. 5 डिसेंबर २००२१ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १० डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी होईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.