कर्ज फेडण्यासाठी दुचाकीची चोरी, पोलीसांनी...

जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली दुचाकी, पुंडलीकनगर पोलीसांनी केली आरोपीला अटक...

कर्ज फेडण्यासाठी दुचाकीची चोरी, पोलीसांनी...

सुमित दंडुके/औरंगाबाद : काम सुटले, डोक्यावर कर्जही झाले, ते फेडता येत नसल्याने एस.बी.आय बॅंकेतील क्लार्क ने दुचाकी चोरी केल्याची घटना आज समोर आली आहे. उद्धव शिवाजी फड (वय.३५, रा.सिंदखेडराजा) असे आरोपीचे नाव आहे.

अतुल ओंकार शिंदे(वय.३५, रा.शिवनेरी कॉलनी, गारखेडा परिसर) यांची शाईन कंपनीची दुचाकी (क्र.एम.एच.२०.डी.एम.५५४३) काल रात्री घरासमोरुन अज्ञात चोरट्याने चोरुन नेली, यासंबंधी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटिव्ही फुटेज व्हायरल केले होते. पुंडलीकनगर पोलीसांनी सीसीटिव्ही फुटेज पाहून तात्काळ आरोपीचा शोध घेतला. आणि गारखेडा परिसरातील घरातून आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशी केल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी आपण दुचाकी चोरी केली असल्याची कबूली आरोपीने दिली. आरोपी उद्धव हा ३ वर्षांपुर्वी एस.बी.आय बॅंकेत क्लार्क म्हणून कार्यरत होता. मात्र काही कारणांमुळे नोकरी सुटली, आणि कर्जबाजारी झालो. केवळ कर्ज फेडण्यासाठी आपण चोरी केल्याचे उद्धवने पोलीसांना चौकशी दरम्यान सांगितले. आरोपीला पुढील तपासासाठी जवाहरनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पुंडलीकनगर पोलीसांनी दिली आहे.

सदरील कामगिरी पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धनंजय आढाव व सहका-यांनी यशस्वी पार पाडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.