...तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही

आदेश प्राप्त होताच अंमलबजावणी करण्यात येणार

...तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही

औरंगाबाद : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात २६ व्या स्थानी आहे. याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जिल्हा प्रशासनाला जाब विचारून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रशासनानेही आता कडक धोरण अवलंबले आहे. लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, गॅस, रेशन मिळणार नाही. तसेच जिल्ह्यात पर्यटनस्थळांवर प्रवेश मिळणार नाही.खाजगी किंवा सरकारी वाहनाने प्रवासबंदी करण्यात आली आहे. याशिवाय हाॅटेल, रिसार्ट, दुकाने आदी ठिकाणी लसीकरण सक्तीचे करण्यात केले आहे. ०९ नोव्हेंबरपासून हे सक्तीचे आदेश जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत.

लस न घेतलेल्यांना पर्यटनावरही बंदी
शहरातील बीबी मकबरा, औरंगाबाद लेणी, पितळखोरा,अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आदी पर्यटनस्थळांसाठीही हा आदेश लागू आहे. पर्यटनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये व पर्यटन आयोजकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्र सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. लसीची एकही मात्र न घेतलेल्या नागरिकांना सरकारी अथवा खासगी गाडीने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवास करता येणार नाही. पर्यटन स्थळांवरील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, दुकाने यामधील कर्मचारी व मालकांनी लसीची किमान एक तरी मात्र घेतलेली असणे बंधनकारक आहे.

लसीकरणाचे प्रमाण जिल्ह्यात किती?
राज्यात लसीकरणाचे प्रमाण ७४ टक्के असताना औरंगाबाद जिल्ह्यात मात्र फक्त ५५ टक्के नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. तर २३ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे प्रमाण अत्यावश्यक आहे. त्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केले जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.