...तर निवडणूकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी-शिंगाडे

न.प.राज्यात विकास कामात अव्वल

...तर निवडणूकीच्या तोंडावर केलेली स्टंटबाजी-शिंगाडे

निलंगा: नगरपालिका मध्ये नागरिकांच्या नावावर केले ठिय्या आंदोलन कसले हे तर राजकीय पुठा-यांनी द्देषापोटी केलेली स्टंटबाजी होती, असे म्हणत नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी स्पष्टीकरण दिले.

या स्टंटबाजी बद्दल बोलताना नगराध्यक्ष शिंगाडे म्हणाले की, निलंगा नगरपालिका क वर्गात असून माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील तीन वर्षाच्या काळात राज्यात सर्वात जास्त विकास निधी आणत शहराच्या इतिहासात सर्वाधिक कामे केली आहेत.विकास कामात ही न.पा.राज्यात अव्वल असून यात शंभर कोटीची पाणीपुरवठा योजना आणली व त्यातून शहरवाशीयाना मीटरने पाणी पुरवठा करून दररोज पाणी देण्याचे काम करत आहे.अशोकनगर येथील काही विरोधक मंडळीने सर्व काही सुरळीत चालू असताना केवळ व्देषापोटी आंदोलन केले असून ते अशोकनगर भागातील लोकांना मान्य नाही.जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यानी सांगितले,अशोकनगर भागातील अनेक गोरगरीब जणता स्वस्थ धान्यापासून वंचित होते.त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनकार्ड नव्हते अशा उपेक्षित लोकांना तब्बल दिडशे कार्ड नगरपालिकेने दिले असून त्यांना वेळेवर धान्य उपलब्ध होत आहे.तसेच या भागातील ८९ लाभार्थ्यांना न.प.ने रमाई घरकुल योजनेतून घरे मिळवून दिले आहेत.तर या नगरात नविन नाल्या पक्के रस्ते बांधकाम करण्यात आले आहे.आणि रस्त्याच्या कडेला संपूर्ण स्र्टेटलाईट उभा करण्यात आली आहे.शासकीय नियमाप्रमाणे शहरातील सहाहजार पाचशे नळजोडणी करण्यात येत आहे.तसेच त्याच नियमाप्रमाणे एका उंब-याला चाडेचार हजार प्रमाणे नविन नळजोडणी मीटर बिल भरणा करून घेतला जात आहे.आणि या नगर मधील जणता भरणा करून कायमस्वरूपी या नविन नळजोडणीसाठी प्रतिसाद देत असताना देखील केवळ नागरिकांची दिशाभूल करून त्यांना नळजोडणी बिलाबाबत संभ्रम निर्माण करून त्यांचे नुकसान करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष शिंगाडे यानी केला आहे.

शहरातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भविष्यात कधीही शहरवाशीयांना पाण्यासाठी भटकंती करता येऊ नये म्हणून आ.निलंगेकर यांनी दुरदृष्टी ठेऊन शंभर कोटी रूपयांची नविन पाणीपुरवठा योजना आणली आहे.यामुळे नळाला मुबलक व लागेल तेवढेच पाणी घेता येणार आहे.यातून या भागातील नागरिकांचे महिण्याकाठी ६० लाख रूपयांची बचत होणार आहे.याच लोकांना नळाला मोटार लावून पाणी घेतल्याने अव्वाच्या सव्वा बिल येत होते त्याची मोठी बचत होणार असून महिण्याला पन्नास ते साठ रूपयात मुबलक व भरपूर चोविस तास पाणी मिळणार आहे.माञ निव्वळ नगरपालिका निवडणूका तोंडावर असताना या काही पक्षाच्या राजकीय पुढा-यांनी स्टंटबाजी केली असून ते सफल होणार नाहीत शहरातील जणता विकास कामाबद्दल समाधानी असताना केवाळ त्यांचे नुकसान करण्यासाठी हे आंदोलन होते अशा प्रतिक्रिया शिंगाडे यानी दिल्या.

निलंगा शहराच्या इतिहासात आतापर्यंत अशोकनगर हा भाग अनेक मुलभूत सुविधापासून वंचित होता.माञ मागील पाच वर्षाच्या काळात माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर यानी या भागाकडे विशेष लक्ष देऊन या भागातील नागरिक कोणत्याही मुलभूत व सार्वजनिक व वैयक्तिक लाभापासून वंचित राहू नये म्हणून सर्वात जास्त विकास निधी दिला आहे.हा आंदोलानाचा प्रयत्न म्हणजे निव्वळ लोकांना दिशाभूल करणे व आपली पोळी भाजून घेणे एवढाच होता.परंतु येथील जणता सुजान व सुज्ञ असून विकास कोण केला हे त्यांना पुरते माहित आहे.अशा स्टंटबाज व जनाधार नसलेल्या पुढाऱ्यांना जणता चांगलीच ओळखून आहे.अशी प्रतिक्रिया सदरील झालेल्या आंदोलनाबद्दल नगरसेवक विष्णू ढेरे यानी दिली आहे.

आरोग्य आणि स्वच्छता बाबत नगरपालिका वेळोवेळी या भागातील नागरिकांची काळजी घेत असून एकदिसआड धूर फवारणी नाली सफाई वेळोवेळी केली जात असून जणतेच्या आरोग्याची काळजी नगरपालिका घेत आहे.या भागातील लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी होणार नाहीत.अशा सुविधा नगरपालिका पुरवत आहे.अडचणी संदर्भात महिला नगरसेविका म्हणून सुचना करताच नगरपालिका तात्काळ लोकांना सेवा देत आहे.परंतु केवळ राजकारण म्हणून विरोधकांनी काम करता लोकांच्या हिताचे काम करावे अन्यथा जनता हूशार आहे अशा तुमच्या दिशाभूल करण्याला कोणीही बळी पडणार नाही.असे म्हणत नगरसेविका रेखा सुरवसे यानी आंदोलनकर्त्यांवर टीका केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.