एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीज बिल माफी नाही - प्रकाश आंबेडकर

1 min read

एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीज बिल माफी नाही - प्रकाश आंबेडकर

ज्यांनी विज बिल भरले ते माफ केले जाणार नाही, हे राज्यावर दुर्दैव आहे

श्वेता भेंडारकर/ मुंबई:  एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवल्यामुळे वीजबिल माफीचा निर्णय झालेला नाही. महाराष्ट्राच्या वीजबिल माफीसंदर्भात निर्णय कोण घेणार, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
राज्य शासनाने विजेच्या संदर्भात जो निर्णय घ्यायला हवा होता, तो घेतलेला नाही, ज्यांनी बिल भरले ते माफ केले जाणार नाही, हे राज्यावर दुर्दैव आहे, अशी टीकासुद्धा त्यांनी ठाकरे सरकारवर केली. ऊर्जामंत्र्यांना त्यांच्या खात्याची माहिती नाही, ती जर माहिती असती तर त्यांनी ही भूमिका घेतली नसती. एका मंत्र्याने फाईल दाबून ठेवली आहे. मी मुख्यमंत्री यांना विचारतो महाराष्ट्राचा निर्णय कोण घेईल, मुख्यमंत्री की एखादा मंत्री निर्णय घेतो, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.
निर्णय घेत असेल तर ते जाहीर करावे, मुख्यमंत्री निर्णय घेत असतील तर महावितरण बोर्डाने दिलेल्या नोटचा खुलासा करावा, नाहीतर बघून घेऊ, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. वीज कंपनी म्हणते, आपण 50 टक्के तोटा सहन करू शकतो. पहिल्याचे वीजबिल भरू नका ही भूमिका घेतली होती, असा खुलासाही प्रकाश आंबेडकरांनी केला.