आठ दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे नाहीत

व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान

आठ दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे नाहीत

परभणी : शहरात गेल्या ११ जुलै रोजी ढगफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक दुकानात पाणी जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी अनेक व्यापाऱ्यांनी परभणीचे तहसीलदार यांना अचानक पडलेल्या पावसामुळे आमच्या दुकानाचे आर्थिक नुकसान झाले असून त्याची पाहणी करून पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवावा व आर्थिक मदत करावी, अशा आशयाचे निवेदन अनेक व्यापाऱ्यांनी दिले होते. परंतु आठवडा उलटूनही दुकानाचे साधे पंचनामे केले नाहीत म्हणून व्यापारी चिंता व्यक्त करीत आहेत. दरम्यान परभणी येथील डॉ. हेडगेवार मार्गावर असलेले व्यंकटेश होजिअरी अँड रेडिमेड हे दुकान पाण्याने अर्धे अधिक भरले होते त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आर्थिक नुकसान मिळण्यासाठी त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.