रेमीडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा होणार-आ. पाटील

10 कोविड सेंटरची नोंद करण्यात आली असून सद्यस्थितीत 30 कोवीड सेंटर्स नव्याने सुरू करण्यात आले आहेत.

रेमीडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा होणार-आ. पाटील

परभणी: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली असून मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याबद्दल आ. राहुल पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन सहसंचालक यांच्याकडे शुक्रवार 9 एप्रिल रोजी विचारपूस केली. यानंतर आता ईंजेक्शनचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल असे या एजन्सीने सांगितले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे जिल्हा सहसंचालक नितीन मरेवार व रेमडेसिवीरचे जिल्हा वितरक विपुल एजन्सी यांच्यासोबत बैठक घेऊन सत्यपरिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परभणी जिल्ह्यात पुणे येथील हेत्रो कंपनीच्या वतीने रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येतो, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पावले यांनी आ. पाटील यांना सांगितले. सुरुवातीला जिल्ह्यात फक्त 10 कोविड सेंटरची नोंद करण्यात आली असून सद्यस्थितीत 30 कोवीड सेंटर्स नव्याने सुरू करण्यात आले आहेत.

सदर नवीन कोविड सेंटरचा कोड जनरेट करण्यात न आल्यामुळे इंजेक्शनच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. येत्या एक-दोन दिवसात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचा कोड जनरेट करण्यात येवून मागणीच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात येईल, असे हेत्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पावले यांनी आ. पाटील यांना सांगितले. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक नितीन मरेवार, जिल्हा वितरक विपुल एजन्सी शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, डॉ. विक्रम पाटील, माजी शहरप्रमुख अनिल डहाळे, नवनीत पाचपोर ज्ञानेश्वर पवार, दिलीप ताडकळसकर आदी उपस्थित होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.