शाळेत ४० मिनिटांचे ४ तासच होणार - वर्षा गायकवाड

1 min read

शाळेत ४० मिनिटांचे ४ तासच होणार - वर्षा गायकवाड

शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई: महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या पुर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हा - जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन - अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे. ४० मिनिटांचे चार तासच शाळेत होणार आहेत.