शहरात लवकरचं होणार ही स्मार्ट कामे...!

1 min read

शहरात लवकरचं होणार ही स्मार्ट कामे...!

शहराला स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या १० शहरात स्थान मिळवून देण्याचा मानस.

सुमित दंडुके / औरंगाबाद : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधीचा योग्य विनियोग होत असून मनपातर्फे कचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. कचरा डेपेात कचरा प्रक्रिया केंद्राचीही कामे सुरु आहेत. शहरात स्वच्छता मोहिम १ नोव्हेंबर ते दिवाळीपर्यत राबविण्यात येणा आहे. शहराला स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या १० शहरात स्थान मिळवून देण्याचा मानस असल्याची माहिती मनपा प्रशासक पांडेय यांनी दिली.
संत एकनाथ रंगमंदिर नाटयगृहाचे काम येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. तर संत तुकाराम नाटयगृहाचे काम दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच शहरातील हॉटेल अमरप्रीत चौक येथे स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प तयार करणे (म्युरल), सिडको कॅनॉट प्लेस येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा, विवेकानंद गार्डन येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे काम प्रगतीपथावर असून शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे सुशोभीकरण करण्याचे कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर औरंगपुरा येथील भाजीमंडईचे काम १ वर्षात तर शहागंज भाजीमंडईचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल, त्याचबरोबर शहरातील पार्किग व्यवस्था, हॉकर्स् झोन करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची माहिती पांडेय यांनी दिली.