पाहीजे त्यांना मिळेना अन हक्काचे घेईना! मनपाकडे हजारो लसी पडून

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खेळखंडोबा सुरू आहे...

पाहीजे त्यांना मिळेना अन हक्काचे घेईना! मनपाकडे हजारो लसी पडून

औरंगाबाद : सध्या देशात ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. पण ४५ वर्षावरील व्यक्ती लस घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे महापालिकेकडे पडून असलेल्या लसींची संख्या ३५ हजार एवढी झाली आहे. लस घेण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिक महापालिकेकडे खेट्या मारत आहेत. पण शासन आदेशानुसार त्यांना लसी देता येत नसल्याने हजारो लसी पडून आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा खेळखंडोबा सुरू आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली पण केंद्र शासनाने फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने लसीकरणाची गती वाढविण्यात आली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्यानंतर जोरदार प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसी तब्बल १० हजारपेक्षा जास्त लसीकरण महापालिकेमार्फत करण्यात आले. पण या वयोगटाच्या लसींची जबाबदारी राज्य शासनावर टाकण्यात आली.

राज्य शासनाला लसी मिळत नसल्याने हे लसीकरण स्थगित करण्यात आले व ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करताना कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवस केले. तेव्हापासून लसीकरणाची गती मंदावली आहे. दिवसाला जेमतेम हजार ते दीड हजार लसीकरण केले जात आहे तर शासनाकडून मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे लसी पडून राहत आहेत. सध्या ३५ हजार लसी महापालिकेकडे पडून आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.