जीव धोक्यात घालून पिण्याचे  पाणी आणायचे अन त्याच पाण्याने आरोग्य धोक्यात घालायचे.

1 min read

जीव धोक्यात घालून पिण्याचे पाणी आणायचे अन त्याच पाण्याने आरोग्य धोक्यात घालायचे.

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण....

उदगीर : मराठवाड्यातील प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले तिर्थक्षेत्र डोंगरशेळकी (ता. उदगीर) येथील सर्व सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गेली पंचवीस वर्षे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वार्ड क्रमांक एक येथील नागरिकांना पिण्याचे पाणी भरण्यासाठी चक्क शेतामध्ये जावे लागत आहे. गावाच्या वरच्या बाजूला मोठे साठवण तलाव आहे. तलाव पूर्ण भरलेला असुन सांडव्याने पाणी वाहत आहे. गावातील नळाला साठवण तलावातील सार्वजनिक विहीरीने पाणी पुरवठा कार्ड क्रमांक तीन व दोनला केला जातो. तर मंदिर शेजारी असलेल्या सार्वजनिक आडामधुन वार्ड क्रमांक दोन व तीन ला केला जातो, तसेच सार्वजनिक आड वार्ड क्रमांक दोन (धनगर समाज वस्ती) मध्ये एक विनावापरामुळे पाणी खराब होत चालले आहे. त्यामुळे पिण्यासाठी नळाचे पाणी योग्य नसल्याचे पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून जवळपास अर्धा कि.मी.दूरवर असलेल्या एका साध्या विहीरीतून पाणी आणावे लागत आहे, त्या विहिरीत चिखल व घाणीने भरलेल्या पायानी आत उतरावे लागत आहे. पायाची सर्व घाण पाण्यात पडत असते तेच पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
WhatsApp-Image-2020-10-19-at-3.53.24-PM
ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खाजगी बिसलेरीचे पाणी व ग्राम पंचायतने बसवलेले ऑरो फिलटर पाणी वापरतात. परंतु सर्वसामान्य, मोल मजूरी करणा-यांना ते परवडणारे नसल्याने ते अस्वच्छ असलेल्या विहिरीचेच पाणी वापरतात त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे . विशेष म्हणजे त्या विहिरीला जाण्यासाठी नालीचे पाणी जाण्यासाठी नाला आहे त्या नाल्याने हा पाणी आणत आहेत. पावसामुळे चिखल झाला आहे, तसेच दुतर्फा गवत व छोटे छोटे झूडपे वाढल्याने सापाची भिती नाकरता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत जीव धोक्यात घालून सर्वसामान्य माणसाला पिण्याचे पाणी आणावे लागत आहे तेंव्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून पिण्याच्या पाण्याची गावातच कायमची व्यवस्था करावी अशी मागणी गावकरी करत आहेत.