हा तर पैसे उकळण्याचा बनाव-राजेश विटेकर

तृप्ती देसाई यांच्या आरोपावर राजेश विटेकरांचे पुराव्यासह प्रसिद्धीपत्रक

हा तर पैसे उकळण्याचा बनाव-राजेश विटेकर

सोनपेठ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले होते. त्या आरोपावर विटेकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढून हे सर्व आरोप फेटाळून लावत उषा हाट्टे यांच्या कुटुंबियांना पैसे उकळण्याचा हव्यास जडला असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पत्रकातून मांडत देसाई यांचे आरोप पुराव्यासह फेटाळून लावले आहेत.

यात मागील काही दिवसांपासून माझ्या महातपुरी कै.रामकृष्ण बापू महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या कार्यरत असणाऱ्या उषा हाट्टे आणि तीच्या कुटुंबियांनी पैसे उकळण्याचा बनाव रचलेला असल्याचे विटेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून नमूद केले आहे. यासोबतच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप धांद्यात खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. सदरच्या पत्रकातून त्यांनी जी महीला तीचे लग्न झाल्यानंतर सलग चार वर्षे आपल्या पतीसोबत संसार करु शकत नाही. ज्या व्यक्तीने लग्नासाठी मध्यस्थी केली आहे. त्या व्यक्तीला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करुन त्रास देते.ज्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्या व्यक्तीला न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल दिलेला आहे.एवढेच नव्हे तर उषा हाट्टे यांचे पती सतीश सुरवसे यांनी पत्नी नांदायला यावी म्हणून कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली होती.तेव्हा देखील कौटुंबिक न्यायालयाने हाट्टे यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत.

याचबरोबर एका महिलेमार्फत परळी येथील पोलिसांत हाट्टे यांच्या पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच दत्तात्रय सिंदाळकर यांच्यावर गंगाखेड येथे खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही या पत्रकात नमूद करून कै.रामकृष्ण बापू महाविद्यालय महातपुरी येथे कार्यरत असणाऱ्या हाट्टे यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी ठेऊन शाळेत न येणे,हजेरीपठावर स्वाक्षऱ्या करत वरिष्ठांना अरेरावी करणे,असा प्रकार सातत्याने केल्याने संस्थेच्या वतीने शिक्षणअधिकारी यांना सदर महिलेच्या विरुद्ध कार्यवाही करण्याची शिफारस केलेली असल्यानेच या महिलेने देसाई यांच्यामार्फत पत्रकार परिषदेत खोटे आरोप केलेले आहेत. करण्यात आलेले आरोप खोटे असून वर नमूद करण्यात आलेल्या सर्व गुन्ह्यामध्ये न्यायालयाने पोलीसांच्या तपासावर असेच सर्व साक्षीदार यांची उलटतपासणी घेऊन उषा हाट्टे व त्यांचे कुटुंबीय खोटे गुन्हे दाखल करण्यात माहीर असल्याचे ताशेरे ओढलेले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर हाट्टे कुटुंबियांना पैसे उकळण्यासाठी बनाव रचण्याची सवय लागल्याचे नमूद करुन आम्हीच सर्व असण्याचा आभास होत असल्याचे विटेकर यांनी स्पष्ट केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.