औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ- पालकमंत्री देसाई

महाविकास आघाडीचे सर्व नेते आता याबाबत लवकरच निर्णय घेतील...

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ- पालकमंत्री देसाई

औरंगाबाद : शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना गंभीर असुन, नामांतरासाठी हीच योग्य वेळ असल्याचे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले आहे.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद या शहराचं नाव संभाजीनगर असे केले होते. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष देखील सत्तेत आहेत, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आता याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे सुभाष देसाई म्हणाले आहेत. काही तांत्रिक समस्या असून त्यावर लवकरच तोडगा निघेल असेही ते पुढे म्हणाले. या पूर्वी विभागीय आयुक्तांकडे नामांतराबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हे पाहता आता औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव करण्याची ती वेळ आलेली आहे आणि लवकरच राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.