यंदा 'बिग बींची दिवाळी नाही', जाणून घ्या काय आहे कारण ?

1 min read

यंदा 'बिग बींची दिवाळी नाही', जाणून घ्या काय आहे कारण ?

यंदा मात्र बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे दिवाळी साजरी करणार नाही, असं त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने एका इंटरव्यू दरम्यान सांगितलं आहे

मुंबई: बॉलीवूड दिवाळी साजरी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. दिवाळी म्हणलं की, सेलिब्रीटी आघाडीवर असतात. पण यंदा मात्र बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे दिवाळी साजरी करणार नाहीत, असं त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने एका इंटरव्यू दरम्यान सांगितलं आहे. २०२० हे वर्ष खूप वाईट गेले. अनेक लोकांना आपण गमावले आहे, कोणालाही सणासाठी एकत्र येता येणार नाही. सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटीही घरीच दिवाळी साजरी करण्यासाठी तयारी करत आहे. अभिषेकने बोलताना सांगितले की, माझी बहीण श्वेता हिच्या सासू (ऋतू नंदा) यांची डेथ झाली आहे. म्हणून पार्टी ठेवता येणार नाही, एवढ्या मोठ्या संकटातून जग आता बाहेर पडत आहे. अश्यात सोशल डिस्टॅंसिंग खूप महत्वाचे आहे. या सगळ्या गोष्टी पाहता यंदा दिवाळीच्या पार्टीचा कोणताही विचार नाही असं त्यांनी सांगितलं.