यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा आनंदाची बातमी आहे.

यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षाही अधिक पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसणाऱ्या बळीराजासाठी यंदा आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीच्या १०१% इतका पाऊस पडू शकतो. यंदाचा मान्सून हा नेहमीच्या तुलनेत सामान्यच राहणार असला तरी, पर्जन्यवृष्टी मात्र पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० % च्या आसपास होण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज व्यक्त केला होता त्यात ९८ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता या बाबत सुधारित अंदाज व्यक्त केला असून तो सरासरीच्या १०१ टक्के असेल असे सांगण्यात आले आहे. भारतात प्रामुख्याने जून ते सप्टेंबर या काळात मान्सून बरसेल असे हवामान विभागाने म्हंटले आहे. प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने त्याचा फायदा नैऋत्य मान्सूनला होणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण मॉन्सून हंगामात पाऊस जर ९६% ते १०४ % पडला तर या पर्जन्यवृष्टीला सामान्य मान्सून म्हणून ओळखले जाते. यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी ९२% ते १०८% इतकी होऊ शकते. हाच मान्सून दख्खनच्या पठारावर ९३% ते १०८% इतका कोसळू शकतो असे भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.  दरम्यान, जुलै महिन्यात पर्जन्यमान कसे राहील याबाबत हवामान विभागाकडून जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.उत्तर-पूर्व भारतातही मान्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर-पूर्व भारतात ९५% तर मध्य भारतात १०६% इतका पाऊस पडण्याची  चिन्हे आहेत.

मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार,  मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याआधी महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. सुधारित अंदाजानुसार यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचे आगमन होणार आहे. सध्या केरळमध्ये आम्रसरी कोसळत आहेत. त्यामुळे किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर पावसाळा सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.