कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आयपीएल स्पर्धा स्थगित बाबत घोषणा केली

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा स्थगित

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा प्रकोप झाला. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच सुरू असलेले आयपीएल मध्ये देखिल कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल २०२१ ची स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. आयपीएलमधील उर्वरित सामने कधी घेण्यात येतील याबाबत आयपीएलकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

खेळाडूंच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि इतरही व्यक्तींची पूर्ण जबाबदारी बीसीसीआय घेत असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे. बायो बबल, सातत्याने होणाऱ्या कोरोना चाचण्या आणि प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगूनही आयपीएल स्पर्धेत कोरोना विषाणने शिरकाव केलाच. खेळाडूंच्या मनात असणारी भीती सार्थ ठरली आणि कोलकाता संघातील काही खेळाडूंना या विषाणूची लागण झाली. सोमवारी यासंदर्भातील माहिती समोर आली. ज्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरु हा सामना रद्द करण्यात आला. तर, संघातील इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला. आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव करण्यापूर्वीच काही परदेशी खेळाडूंनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंतेचा सूर आळवत या स्पर्धेतून माघारही घेतल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र हे संकट आणि अधिकाधिक खेळाडूंना होणारी कोरोनाची बाधा पाहाता बीसीसीआयकडूनच ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने प्रसिद्ध केले आहे.

आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक

दरम्यान काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ३ मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत. याआधी गेल्या वर्षी २०२० मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.