अवैध धंद्याची बातमी करणाऱ्या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

पत्रकाराचे कुटुंबिय भयभित कासार शिरसी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

अवैध धंद्याची बातमी करणाऱ्या पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

निलंगा : अवैध धंद्याची बातमी का दिली म्हणून कोकळगाव येथील एका पत्रकारासह त्याच्या कुटुंबियाला जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे एका व्यक्तीवर कासार शिरसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील एका दैनिकाचे पञकार द्रोनाचार्य कोळी यांनी मागील काही दिवसापूर्वी गावात व परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू असून त्याचा सर्वसामान्य नागरिक व महिलांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. या अवैध धंद्यामुळे गावातील शांतता भंग पावली असून मद्यपी दिवसाढवळ्या चौकात आर्वाच भाषेत शिवीगाळ करत आहेत. तसेच अवैध धंदेवाल्यावर पोलिस प्रशासन व गावपुढारी दुर्लक्ष करत असल्याने त्याची वाचा फोडण्यासाठी पञकार यांनी या अवैध धंद्याची बातमी मागील काही दिवसापूर्वी एका दैनिकातून प्रकाशित केली होती. त्याचा राग मनात धरून गावातील व परिसरातील सर्व अवैध धंदेवाल्यानी कोकळगाव येथील हरी गुंडू वाकडे व बाबाराव गुंडू वाकडे या दोघांना दारू पाजवून संबंधित पञकार द्रोनाचार्य कोसाळी या पञकाराच्या घरासमोर जाऊन आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्याला व त्याच्या कुटुंबियाला जीवे मारण्याची धमकी दिली व मध्यराञी संबधित पञकाराच्या घरावर दगडफेक केली आहे. अशा या गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून त्यांना कायमचा धडा शिकवावा, अशी मागणी होत आहे.

कोळी कुटुंबिय भयभीत
द्रोनाचार्य कोळी यानी दिलेल्या बातमीवरून त्यांच्या राहत्या घरावर दगडफेक करीत त्यांच्यासह कुटुंबियास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असला तरीही निलंगा तालुक्यातील गावागावामधून असे प्रकार होत आहेत. अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या विरोधात सामान्य माणूस पञकार उठाव करताच त्यांच्यावर हे लोक पैशाच्या जोरावर हल्ले करणे, त्याना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, करत आहेत. नेमके या अवैध धंदेवाल्यांना कोणाचे अभय आहे. अशी चर्चा होत आहे.

पोलीस म्हणतात..
अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची मुजोरी वाढत असेल तर पोलिस प्रशासन खपवून न घेता अशा लोकांना धडा शिकवून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यानी संपर्क केला असता सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.